

साहित्यप्रभा आयोजित काव्यसंमेलन उत्साहात
अलिबाग, ता. ११ (वार्ताहर) : प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत पीएनपी कला विकास मंडळाकडून साहित्यप्रभा आयोजित काव्यसंमेलन रविवारी (ता. १०) उत्साहात पार पडले. या काव्यसंमेलनाला पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह, पीएनपी कला विकास मंडळाच्या अध्यक्षा चित्रलेखा नृपाल पाटील उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मराठी चित्रपट सृष्टीमधील सुप्रसिद्ध गीतकार दिवंगत जगदीश खेबुडकर यांचे चिरंजीव मुकुल खेबुडकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कै. प्रभाकर पाटील (भाऊ) यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व मान्यवरांनी अभिवादन केले. तसेच गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांनी त्यांना आदरांजली वाहिली. या काव्यसंमेलनाचे प्रास्ताविक पीएनपी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, कवी डॉ. ओमकार पोटे यांनी केले.
कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे मुकुल खेबुडकर यांनी आपल्या मनोगतामध्ये जगदीश खेबुडकर यांच्या आठवणींना उजाळा देऊन काही निवडक कविता सादर केल्या. या काव्य मैफलीमध्ये ‘माझी आठवणीतील शाळा’, ‘हरवलेले बालपण’ आणि ‘माती’ हे प्रमुख विषय वैशिष्ट्यपूर्ण ठरले. दिलेल्या विषयाला अनुसरून पन्नासपेक्षा जास्त कवींनी आपल्या स्वलिखित कवितांचे सादरीकरण केले. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून कवींनी आपली उपस्थिती दर्शवून या काव्य मैफिलेची शोभा वाढवली. आपल्या अध्यक्षीय वक्तव्यामध्ये पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह तसेच पीएनपी कलाविकास मंडळाच्या अध्यक्षा चित्रलेखा नृपाल पाटील यांनी साहित्यामधून आणि लिखाणामधूनच क्रांती जन्माला येते असे ऐतिहासिक संदर्भ देऊन नमूद केले. तसेच सर्व कवींनी आणि साहित्यिकांनी आपले सकारात्मक विचार जगासमोर आणावे असे आवाहन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.