

मुरबाड, ता. ११ (वार्ताहर) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील बळेगाव-उमरोली परिसरात राज्य परिवहन महामंडळाच्या जलद बसगाड्यांना अधिकृत थांबा देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.
करचोंडे येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश घरत यांनी या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, मुरबाड; तसेच इतर शहरांकडे धावणाऱ्या अनेक जलद बसगाड्या या मार्गावरून जात असल्या, तरी बळेगाव-उमरोली परिसरातील प्रवाशांना त्याचा लाभ मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, जलद बसगाड्यांचा थांबा नसल्यामुळे प्रवाशांना दूरच्या स्थानकांवर जावे लागते. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा अतिरिक्त भार सहन करावा लागत आहे. विशेषतः विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा फटका बसत असून पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर बनते. परिसरातील वाढती प्रवाशांची संख्या लक्षात घेता बळेगाव-उमरोली येथे अधिकृत बस थांबा मंजूर करणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.
दरम्यान, राज्य परिवहन विभागाचे अधिकारी तसेच प्रकाश सरनाईक यांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन जलद बसगाड्यांना थांबा मंजूर करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.