राजावाडी रुग्णालयात जागतिक परिचारिका दिन उत्साहात

राजावाडी रुग्णालयात जागतिक परिचारिका दिन उत्साहात
Published on

घाटकोपर, ता. १२ (बातमीदार) : जागतिक परिचारिका दिनानिमित्त घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात परिचारिकांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेविका डॉ. अर्चना भालेराव यांच्या वतीने करण्यात आले होते. याप्रसंगी परिचारिकांच्या आरोग्यसेवेतील मोलाच्या योगदानाचा गौरव करत त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला भाजप मुंबई महिला मोर्चाच्या अध्यक्षा योजना ढोले ‘एन’ विभाग प्रभाग समिती अध्यक्षा अश्विनी मते, राजावाडी रुग्णालयाच्या प्रभारी डॉ. भारती राजुलकर, डॉ. अजय गुर्जर, डॉ. सुनील मजूमदार, दामू शर्मा, रवी डोके यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी, परिचारिका तसेच भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांनी परिचारिकांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक करीत आरोग्य व्यवस्थेत त्यांच्या योगदानाला महत्त्व असल्याचे सांगितले.

घाटकाेपर : राजावाडी रुग्णालयात जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

Marathi News Esakal
www.esakal.com