महामार्गावर आंब्यांनी भरलेला टेम्पो पलटी

महामार्गावर आंब्यांनी भरलेला टेम्पो पलटी
Published on

आंब्याच्या टेम्पोला चारोटीत अपघात
महामार्गावर नागरिकांची झुंबड, वाहतूक विस्कळित

कासा, ता. १२ (बातमीदार) ः मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चारोटी टोलनाक्याजवळील चामदरा पुलालगत आंब्यांनी भरलेला टेम्पो पलटी झाला होता. या अपघातानंतर टेम्पोमधील आंबे रस्त्यावर विखुरल्याने नागरिकांनी एकच गर्दी केल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळित झाली होती.
गुजरातहून मुंबईकडे आंब्याची वाहतूक करणारा टेम्पोवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. अपघातात चालक किरकोळ जखमी आहे; पण घटनेनंतर टेम्पोमधील आंब्याच्या पेट्या रस्त्यावर पडल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. आंबे गोळा करण्यासाठी नागरिकांनी पिशव्या, गोण्यांसह धाव घेतल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
----------------------
सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष
हंगाम सुरू असल्याने गुजरातमधून मुंबईसह विविध भागांत मोठ्या प्रमाणात आंब्यांची वाहतूक केली जात आहे; मात्र अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे शासनाने महामार्गावरील सुरक्षा उपाययोजना अधिक कडक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com