डोंबिवलीतील बेशिस्त रिक्षाचालकांवर पोलिसांचा दणका

डोंबिवलीतील बेशिस्त रिक्षाचालकांवर पोलिसांचा दणका
Published on

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १२ : रेल्वे स्थानक परिसरासह शहरातील विविध भागांत वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने रिक्षा उभ्या करणाऱ्या बेशिस्त चालकांविरोधात रामनगर पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, तसेच नागरिकांच्या सुरक्षेला धोका पोहोचवल्याप्रकरणी सात रिक्षाचालकांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत.

डोंबिवली स्थानक परिसरातील गर्दीच्या ठिकाणी अनेक रिक्षाचालकांकडून आडव्यातिडव्या रिक्षा उभ्या करून वाहतुकीचा खोळंबा केला जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. त्यामुळे वाहनचालक, पादचारी तसेच प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. काही ठिकाणी रिक्षाचालकांकडून रस्त्याच्या मध्यभागीच प्रवासी घेणे-उतरणे सुरू असल्याने अपघाताचा धोका वाढला होता. या पार्श्वभूमीवर रामनगर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत बेशिस्तपणे रिक्षा उभ्या करणाऱ्या सात रिक्षाचालकांविरोधात गुन्हे दाखल केले. सार्वजनिक वाहतुकीत अडथळा निर्माण करणे, नियमांचे उल्लंघन करणे आणि नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, असे वर्तन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

२०० हून अधिक गुन्हे नोंद
पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत गेल्या वर्षभरात कल्याण-डोंबिवली परिसरातील २००हून अधिक रिक्षाचालकांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com