

होमगार्ड जवानांच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन
शिवडी, ता. १२ (बातमीदार) : होमगार्ड जवानांना वर्षभर कर्तव्य, वेळेत वेतन आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी (ता. ११) आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात आले. समाजसेवक तथा बसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील होमगार्ड जवान सहभागी झाले होते.
पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून अनेक वर्षे सेवा बजावणाऱ्या होमगार्ड जवानांना नियमित काम मिळत नसल्याने तसेच वेतन वेळेवर मिळत नसल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली. एका-दोन महिन्यांच्या कर्तव्यानंतर दोन-तीन महिन्यांचा खंड दिला जातो, तर काही वेळा एका महिन्याच्या कामासाठी वेतन मिळण्यास सहा महिने प्रतीक्षा करावी लागते, असा आरोपही त्यांनी केला.
विद्यमान जवानांच्या समस्या सोडविण्याऐवजी दरवर्षी नवीन भरती प्रक्रिया राबवली जात असल्याबाबतही आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली. होमगार्ड जवानांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले. यासंदर्भातील निवेदन पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल तसेच खासदार आणि आमदारांना पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.