साडेसात लाखांचे दागिने असलेली बॅग महिला प्रवाशाला सुखरूप परत

साडेसात लाखांचे दागिने असलेली बॅग महिला प्रवाशाला सुखरूप परत
Published on

साडेसात लाखांचे दागिने असलेली बॅग महिला प्रवाशाला सुखरूप परत
घाटकोपर, ता. ११ (बातमीदार) : लोकल प्रवासादरम्यान हरवलेली तब्बल साडेसात लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची बॅग वाशी रेल्वे पोलिस यांनी शोधून संबंधित महिला प्रवाशाला सुखरूप परत करत प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला.
जुईनगर रेल्वे स्थानक येथे महिला पोलिस गायकवाड, आरपीएफ जवान शेख आणि जवान निमजे हे नियमित गस्त घालत होते. सायंकाळच्या सुमारास फलाट क्रमांक १ वर जवान निमजे यांच्या निदर्शनास एक बेवारस कापडी बॅग आली. संशय आल्याने पोलिसांनी बॅगची तपासणी केली असता त्यात सोन्याचे विविध दागिने आढळून आले.
बॅगमध्ये असलेल्या कागदपत्रांच्या आधारे पोलिसांनी तत्काळ मूळ मालकाचा शोध सुरू केला. चौकशीत ही बॅग सुषमा तुळशीराम दळवी (रा. सेक्टर १, शिरवण गाव) यांची असल्याचे स्पष्ट झाले. त्या लग्नसमारंभासाठी गावी जाणार असल्याने पनवेल रेल्वे स्थानक येथून प्रवासासाठी जुईनगर स्थानकावर आल्या होत्या.
फलाट क्रमांक ३/४ वरील मिडल लेडीज डब्यासमोर त्या बसल्या असताना त्यांचे पती तिकीट काढण्यासाठी गेले होते. दरम्यान, लोकल आल्याने घाईगडबडीत त्या रेल्वेत चढल्या; मात्र दागिन्यांची बॅग फलाटावरील बाकड्यावरच राहिली. काही वेळातच बॅग विसरल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. महिला प्रवासी नेरूळ रेल्वे स्थानक येथे उतरून पुन्हा जुईनगर रेल्वे चौकीत दाखल झाल्या. पोलिसांनी त्यांना बॅगमधील साहित्य दाखवून खात्री करून घेतली. बॅगमध्ये मंगळसूत्र, नेकलेस, कानातील दागिने यांसह सुमारे सात लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, साड्या आणि इतर साहित्य सुरक्षित असल्याचे आढळले. त्यानंतर पोलिसांनी सर्व साहित्य त्यांच्या ताब्यात सुखरूप परत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com