

सुखद प्रवासाचे संकेत
एमएमआरडीएकडून मेट्रोला हिरवा कंदील
वसई, ता. १२ (बातमीदार)ः वसई-विरार शहरातील प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रस्ते मार्गापेक्षा लोकलने प्रवास करण्याला पसंती दिली जात असल्याने एमएमआरडीएने मेट्रोसाठीचा प्रस्ताव तयार केला आहे. .
मिरा-भाईंदर ते वसई-विरार मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल मे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड या सल्लागार समितीने सादर केला आहे. प्राधिकरणाच्या बैठकीत मेट्रो मार्ग १३ मिरा-भाईंदर ते वसई-विरार या मेट्रो मार्गाच्या प्रकल्प अहवालास मान्यता देण्यात आली आहे. तसेच मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरिता राज्य शासनाची मान्यता घेण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव वसई-विरारपर्यंत मेट्रोसाठी एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांनी प्रकल्प अहवाल राज्य शासनाच्या मान्यतेसाठी पाठवली आहे. या प्रकल्पाची किंमत १७, ७२४.९९ कोटी इतकी असून, प्रकल्पाला राज्य शासनाची लवकरात लवकर मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात मिरा-भाईंदर ते वसई-विरार मार्गे मुंबईपर्यंतचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.
-----------
प्रलल्पाची वैशिष्ट्ये
एकूण लांबी- २५.०३ किलोमीटर
स्थानके - १६
प्रस्तावित आगार - चिखलडोंगरी-विरार
----------------------------
प्रवासाली गती
मेट्रो मार्ग-१३ हा मेट्रो मार्ग-९ (दहिसर ते मिरा-भाईंदर) ला थेट जोडण्याचे प्रस्तावित आहे. मेट्रो मार्ग-१३, मेट्रो मार्ग ९, ७, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ७ अ मार्गाला जोडण्यात येईल. वसई खाडीवरून मेट्रो आणि सहा पदरी रस्त्याचा पूल असे एकत्रीकरण करण्याचे प्रस्तावित आहे.
-------------
‘बविआ’कडून पाठपुरावा
वसई-विरार शहरात मेट्रोसाठी माजी आमदार हितेंद्र ठाकूर, माजी आमदार क्षितिज ठाकूर तसेच माजी आमदार राजेश पाटील यांनी पाठपुरावा केला होता. याच अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी पत्रदेेखील पाठवले होते, तर ३० एप्रिल रोजी महापौर अजीव पाटील, आयुक्त पृथ्वीराज बी. पी., माजी महापौर नारायण मानकर यांनी एमएमआरडीए आयुक्तांची भेट घेतली होती.
-----------------------
वसई खाडीवरून मेट्रोस सहा पदरी रस्त्यामुळे प्रवाशांना निश्चित फायदा होणार आहे. विकासात्मक कामासाठी बविआने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
- नारायण मानकर, माजी महापौर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.