

वज्रेश्वरी, ता. १३ (बातमीदार) : लहान मुलांमध्ये संस्कार, शिस्त, नैतिक मूल्ये आणि सकारात्मक विचारांची जडणघडण व्हावी, या उद्देशाने श्री भीमेश्वर सद्गुरू नित्यानंद संस्थेच्या उन्हाळी बाल संस्कार शिबिराचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
परमपूज्य नित्यानंद बाबा यांच्या प्रेरणेतून शिबिराची सुरुवात रविवारी (ता. १०) सकाळी १० वाजता गणेशपुरी येथील नित्यानंद समाधी मंदिर परिसरातील बालभोजन इमारतीत करण्यात आली. गणेशपुरी ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप खिराडे आणि उपसरपंच गीतांजली घरत यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. याप्रसंगी श्री भीमेश्वर सद्गुरू नित्यानंद संस्थानचे विश्वस्त रवींद्र शुक्ला, विठ्ठल राजपूत, अनुजा सिगलवार, आनंद आनवेकर, सुगंधा जाधव, ग्रामपंचायत सदस्य कृपाली पाटील, कल्याण दीप विभागाचे रमेश आवारे, दूरदर्शनच्या निवेदिका उन्नती जगदाळे आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरात गणेशपुरी परिसरातील ६५ लहान मुलामुलींनी सहभाग नोंदविला आहे. मुलांसाठी संस्कार वर्ग, प्रार्थना, योग, खेळ, कथा, सांस्कृतिक उपक्रम, व्यक्तिमत्व विकासाशी संबंधित विविध कार्यक्रम झाले. बालमनात चांगले संस्कार रुजवून त्यांचे उज्ज्वल भविष्य घडविणे हा संस्थेचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. बालपण हेच उज्ज्वल भविष्यासाठी पेरलेले सुंदर बीज आहे; योग्य संस्कारांनीच ते फुलते, असा संदेश देत पालकांनी आपल्या पाल्यांना या शिबिरात सहभागी करून घ्यावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.