बेकायदेशीर पार्किंगवर कारवाईची मागणी

बेकायदेशीर पार्किंगवर कारवाईची मागणी
Published on

बेकायदा पार्किंगवर कारवाईची मागणी
पोलादपूर, ता. १२ (बातमीदार) : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी ते खेड तालुक्यातील भरणे जाधववाडी ते खोपी फाटा परिसरात वाढत्या बेकायदा पार्किंगमुळे अपघातांचा धोका गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर मदत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद गांधी यांनी संबंधित विभागांना तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी ११ मे रोजी रत्नागिरी जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व इतर संबंधित यंत्रणांना पत्र दिले आहे.
या भागात विशेषतः रात्रीच्या वेळी कोणतीही सुरक्षा साधने न वापरता रस्त्याच्या कडेला वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. आतापर्यंत सुमारे १० ते १५ अपघात घडल्याचे निदर्शनास आले असून, काहींमध्ये जीवितहानीही झाली आहे. तसेच या परिसरात अधिकृत बस थांबा नसल्याने प्रवाशांना रस्त्याच्या कडेला उभे राहावे लागते, ज्यामुळे धोका वाढतो.
या समस्येवर उपाय म्हणून बेकायदा पार्किंगवर कठोर कारवाई, ‘नो पार्किंग’ फलक, रात्री गस्त वाढविणे, क्रेनद्वारे वाहने हटविणे तसेच बस थांबा उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com