३२४ प्रकल्पग्रस्तांना रिलायन्स कंपनीने तातडीने नोकरी द्यावी

३२४ प्रकल्पग्रस्तांना रिलायन्स कंपनीने तातडीने नोकरी द्यावी
Published on

३२४ प्रकल्पग्रस्तांना रिलायन्स कंपनीने तातडीने नोकरी द्यावी
भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेची मागणी
अलिबाग, ता. १२ (वार्ताहर) : नागोठणे येथील रिलायन्स कंपनीमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानंतरही परिसरातील ३२४ प्राधान्य प्रमाणपत्रधारक प्रकल्पग्रस्तांना अद्यापही नोकरी देण्यात आलेली नाही. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने तसे आदेश देऊन प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा मोठे आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदनही सोमवारी (ता. ११) जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली १७ फेब्रुवारी रोजी मंत्रालयात रिलायन्स कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्या बैठकीत प्रकल्पबाधित ३२४ प्रमाणपत्र धारकांना रिलायन्स कंपनीमध्ये तातडीने नोकरी देण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी आदेश काढण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यानंतर जिल्हाधिकारी यांनी तातडीने तसे आदेशही दिले. मात्र, कंपनी व्यवस्थापनाने अद्यापही या आदेशाचे पालन केलेले नाही. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांवर बेरोजगार होऊन बसण्याची वेळ आली आहे. रिलायन्य कंपनीचा प्रकल्प उभारण्यासाठी येथील हजारो एकर जमीन शेतकऱ्यांनी दिली आहे. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांकडे कंपनी प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. या ३२४ प्रकल्पग्रस्तांना कंपनीने तातडीने नोकरी दिली नाही, तर मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com