शिगाव येथे दुचाकी-ट्रकची जोरदार धडक;

शिगाव येथे दुचाकी-ट्रकची जोरदार धडक;
Published on

दुचाकी-ट्रकच्या धडकेत दोघे जखमी

बोईसर, ता. १२ (वार्ताहर) : शिगाव ग्रामपंचायत कार्यालयाजवळ दुचाकी, ट्रकच्या धडकेत दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी १०.४३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
नागझरीकडे निधालेला मालवाहू ट्रक वाघाडीहून बोईसरकडे जाताना दुचाकी शिगाव ग्रामपंचायत कार्यालयाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले होते. या अपघातात वेणू घाटाळ (वय १६), चालक सूरज धापशी (१९) गंभीर जखमी झाले. दोघांच्या पायांना फ्रॅक्चर झाले आहे. तर सूरज धापशी याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून कानातून रक्तस्रावामुळे प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. दोघांवरही नवापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com