शेरे पंजाब कॉलनीतील फुटपाथवर पाण्याचे पाइप; नागरिकांचा जीव धोक्यात

शेरे पंजाब कॉलनीतील फुटपाथवर पाण्याचे पाइप; नागरिकांचा जीव धोक्यात
Published on

शेर-ए-पंजाब कॉलनीतील फुटपाथवर पाण्याचे पाइप; नागरिकांचा जीव धोक्यात

जोगेश्वरी, ता. १२ (बातमीदार) : शेर-ए-पंजाब कॉलनी परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याच्या मोठ्या पाइपांचा साठा फुटपाथवरच ठेवण्यात आल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. फुटपाथ अडवल्यामुळे पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालावे लागत आहे.
फुटपाथवर पाइप टाकून ठेवल्याने येथील पादचारी मार्ग पूर्णपणे अडथळाग्रस्त झाला आहे. तसेच अनेक भूमिगत झाकणे अर्धवट अवस्थेत बंद करण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
याच मार्गावर गुरूनानक हायस्कूल तसेच मेघवाडी पोलिस चौकी असल्याने येथे नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, पालक आणि स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
परिसरातील नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. पाण्याच्या पाइपलाइनचे काम पूर्ण झाले असल्यास हे पाइप तत्काळ हटवून फुटपाथ नागरिकांसाठी मोकळा करावा, तसेच धोकादायक अवस्थेतील भूमिगत झाकणांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे.
मुंबई महापालिका के पूर्व विभाग अधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com