संस्कृत रसास्वाद वर्गाचे आयोजन

संस्कृत रसास्वाद वर्गाचे आयोजन
Published on

संस्कृत रसास्वाद वर्गाचे आयोजन

मुलुंड, ता. १२ (बातमीदार) : महाराष्ट्र सेवा संघाच्या संस्कृत विभागातर्फे संस्कृत रसास्वाद वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (ता. १४) सायंकाळी ७ ते ८.३० या वेळेत होणाऱ्या या वर्गात श्री दत्तात्रेय कवच तसेच भगवद्गीता अध्याय १० यांचा प्रारंभ होणार आहे. संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर वझे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
हा कार्यक्रम शंकर गोखले सभागृह येथे आयोजित करण्यात आला असून प्रवेश विनामूल्य आहे. तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com