रहिवासी इमारतींना दिलासा

रहिवासी इमारतींना दिलासा
Published on

भूमिगत गटार योजनेला गती
मलवाहिन्या जोडणीच्या धोरणात पालिकेकडून बदल

भाईंदर, ता. १२ (बातमीदार) : मिरा-भाईंदर पालिकेच्या भूमिगत गटार योजनेअंतर्गत इमारतीचे अंतर्गत काम आता सोसायटी कंत्राटदारांकडून करता येणार आहे. तसेच इमारतीच्या प्रवेशद्वारापासून मुख्य वाहिनीपर्यंत जोडणीचे काम महापालिका स्वखर्चाने करणार असल्याने रहिवासी इमारतींमधील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शहरात २५ हजारांहून अधिक इमारती असताना भूमिगत गटार योजनेच्या मुख्य वाहिन्यांना अवघ्या १,८२६ जोडणी असल्याची बाब नुकतीच उघडकीस आली होती. महापालिका अधिकाऱ्यांची निष्क्रियता तसेच पालिकेचे धोरण यासाठी कारणीभूत होते. यासंदर्भात आधी निश्चित केलेल्या धोरणानुसार मलवाहिन्या महापालिकेच्या वाहिन्यांशी जोडण्यासाठी सर्व इमारतींना २५ हजार रुपये शुल्क आकारत होते. इमारतीच्या आवारात वाहिन्या अंथरण्यासाठी पालिकेच्या नियुक्त कंत्राटदारांकडूनच काम करून घेणे बंधनकारक होते; पण खर्च अवाच्या सव्वा असल्याने अनेक इमारती योजनेपासून वंचित होत्या.
------------------------------
हजार रुपये अतिरिक्त शुल्क
अनेक ठिकाणी काॅंक्रीटचे रस्ते तोडण्यासाठी मोठा खर्च होतो. काही ठिकाणी जलवाहिन्या, विजेच्या केबलचा अडथळा असतो. त्यामुळे सदानिकांपर्यंतच्या इमारतींना जोडणीचे शुल्क २५ हजार तसेच पुढील प्रत्येक सदनिकेसाठी हजार रुपये अतिरिक्त शुल्क आकरण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com