दिव्यातील नऊ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार

दिव्यातील नऊ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : महापालिका निवडणुकीमध्ये दिवा परिसरातून निवडून आलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या नऊ नगरसेवकांनी शपथपत्रात खोटी माहिती दिली असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे ॲड. रोहिदास मुंडे यांनी केला आहे. कथितरीत्या चुकीची, अपूर्ण व दिशाभूल करणारी माहिती सादर केल्याप्रकरणी न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करण्यात केली आहे. या प्रकरणाची तिसरी सुनावणी ११ जून रोजी ठाणे न्यायालयात होणार असल्याची माहिती मुंडे यांनी दिली.

संबंधित नगरसेवकांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात मालमत्ता, बांधकामे, आर्थिक व्यवहार तसेच इतर आवश्यक बाबींचा तपशील जाहीर न केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. काही ठिकाणी अनधिकृत बांधकामे आणि मालमत्ता लपविल्याचाही मुद्दा न्यायालयासमोर मांडण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालय, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा दाखला देत, निवडणूक शपथपत्रात चुकीची अथवा अपूर्ण माहिती देणे हे गंभीर स्वरूपाचे प्रकरण असल्याचे ॲड. मुंडे यांनी स्पष्ट केले. मतदारांपासून तथ्य लपविल्यास संबंधित निवडणूक रद्द होण्यासह अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले. या प्रकरणात रमाकांत मढवी, शैलेश पाटील, आदेश भगत, दीपक जाधव, साक्षी मढवी, दर्शना म्हात्रे, अर्चना पाटील, दिपाली भगत आणि स्नेहा पाटील या नगरसेवकांविरोधात निवडणूक याचिका दाखल केली आहे.

एका नगरसेवकाने बेकायदा बंगला बांधला असून, वास्तव्याचा तो पत्ता लपवत त्यांनी भलताच पत्ता जेथे ते राहत नाहीत, तो शपथपत्रामध्ये दिल्याचा दावाही मुंडे यांनी केला आहे. हे सर्व नगरसेवक सत्ताधारी पक्षाचे असले तरीही न्यायालयात न्याय मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com