

लोणेरे विद्यापीठाची ऐतिहासिक कामगिरी
११ प्राध्यापकांचा जागतिक शास्त्रज्ञांच्या यादीत झेंडा
माणगाव, ता. १२ (वार्ताहर): डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथील शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ‘ए. डी. सायंटिफिक इंडेक्स २०२६’ने जाहीर केलेल्या जागतिक स्तरावरील शास्त्रज्ञांच्या मानांकन यादीत विद्यापीठातील तब्बल ११ प्राध्यापकांनी स्थान पटकावून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली मोहोर उमटवली आहे.
ए. डी. सायंटिफिक इंडेक्स ही केवळ विद्यापीठाचे मूल्यमापन करणारी संस्था नसून ती शास्त्रज्ञांच्या वैयक्तिक वैज्ञानिक कामगिरीवर लक्ष केंद्रित करते. प्राध्यापकांनी केलेले संशोधन, त्यांच्या शोधनिबंधांची आंतरराष्ट्रीय व्याप्ती आणि वैज्ञानिक उत्पादकता या निकषांच्या आधारे ही जागतिक क्रमवारी जाहीर केली जाते.
संशोधन क्षेत्रातील या यशामुळे केवळ विद्यापीठाचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे नाव जागतिक स्तरावर अभिमानाने घेतले जात आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनाचे संदर्भ घेतले गेल्याने ही निवड झाली असून, या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे मार्गदर्शन उपलब्ध असल्याचे सिद्ध झाले आहे. एकाच विद्यापीठातून ११ प्राध्यापकांची निवड झाली आहे. संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या युगात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने मारलेली ही झेप नक्कीच कौतुकास्पद आहे!
चौकट
समावेश झालेले तज्ज्ञ
१) डॉ. एस. एन. नलबलवार २) डॉ. एस. एम. जाधव ३) डॉ. आर. एस. पावडे ४) डॉ. एन. अग्रवाल ५) डॉ. ब्रिजेश अय्यर
६) डॉ. व्ही. जी. सरगडे ७) डॉ. वाय. एस. महाजन ८) डॉ. बी. एफ. जोगी ९) डॉ. ए. बी. नांदगावकर १०) डॉ. ए. डब्ल्यू. किवळेकर, ११) डॉ. व्ही. जे. कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.