मनोरंजन क्षेत्रातील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर तोडगा काढा

मनोरंजन क्षेत्रातील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर तोडगा काढा
Published on

मनोरंजन क्षेत्रातील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर तोडगा काढा
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ ः राज्यातील सुमारे पाच लाख कंत्राटी फिल्म कामगार व ज्युनियर कलाकारांच्या हितासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करून ठोस उपाययोजना कराव्यात, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.
मुंबईतील गोरेगाव येथील चित्रनगरीसह राज्यातील चित्रपट व करमणूक क्षेत्रातील कंत्राटी फिल्म कामगार आणि ज्युनियर कलाकारांच्या विविध प्रश्नांबाबत आज (ता. १२) विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला आमदार सुनील प्रभू, फिल्म सिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजनीकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव महेश वाव्हळ तसेच विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
गेल्या हिवाळी अधिवेशन २०२५ दरम्यान औचित्याच्या मुद्द्याद्वारे चित्रपट व करमणूक क्षेत्रातील कंत्राटी फिल्म कामगार व ज्युनियर कलाकारांवर होत असलेल्या अन्यायाचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर प्रशासनाने कार्यवाही न केल्याने आमदार सुनील प्रभू यांनी नाराजी व्यक्त केली. शासनाच्या मानक कार्यप्रणालीची अंमलबजावणी करण्याबाबत चित्रनगरी प्रशासनाने संबंधित निर्मिती संस्थांना यापूर्वी सूचना देऊनही अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याबाबत या वेळी चिंता व्यक्त करण्यात आली. कंत्राटी फिल्म कामगार आणि ज्युनियर कलाकारांच्या प्रश्नांवर करण्यात आलेल्या उपाययोजनांचा सविस्तर अंमलबजावणी अहवाल एका महिन्याच्या आत सादर करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्षांनी दिले आहेत.

काय आहे प्रश्न?
कलाकारांच्या कामाचे तास निश्चित करावेत, सकस भोजनाची व्यवस्था, वेतन थेट निर्मात्यांकडून देणे, चित्रीकरण स्थळी स्वच्छता राखणे, महिला कलाकारांसाठी स्वतंत्र कपडे बदलण्याची सुविधा तसेच रात्रीच्या चित्रीकरणानंतर सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे या प्रमुख मागण्या या कामगारांच्या आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com