गुरव समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी आदिती तटकरे यांना निवेदन

गुरव समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी आदिती तटकरे यांना निवेदन
Published on

गुरव समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी आदिती तटकरे यांना निवेदन
इनाम वर्ग ३ जमिनी, पूजाअधिकार आणि आर्थिक विकास महामंडळाची मागणी
कर्जत, ता. १२ (बातमीदार) : अखिल गुरव समाज संघटना, रायगड जिल्हाच्या वतीने राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची भेट घेऊन गुरव समाजाच्या प्रलंबित आणि न्याय्य मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. या वेळी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी आवश्यक असलेल्या विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली.
अखिल गुरव समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. अण्णासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना समाजाच्या मागण्यांचे निवेदन देण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच मोहिमेअंतर्गत रायगड जिल्हा संघटनेने हा पुढाकार घेतला. कर्जत येथील कार्यक्रमासाठी रविवारी (ता. १०) आल्यानंतर समाजबांधवांनी त्यांना निवेदन दिले आहे.
याप्रसंगी रायगड जिल्हाध्यक्ष समीर जगन्नाथ गुरव, जिल्हा महिला अध्यक्षा पूनम गणेश शिर्के, कर्जत तालुका अध्यक्ष सूरज गुरव, तालुका कार्याध्यक्ष जगदीश गुरव यांच्यासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. “समाजाची एकजूट हीच आमची खरी ताकद आहे. शासनाने आमच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन गुरव समाजाला न्याय द्यावा,” अशी भावना या वेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

चौकट
निवेदनातील मागण्या
निवेदनात मंदिरांमध्ये परंपरागत पूजा करणाऱ्या गुरव समाजाला त्यांच्या हक्कांचे संरक्षण मिळावे, इनाम वर्ग ३ जमिनींसंदर्भात न्याय्य निर्णय घ्यावा, तसेच कुळ कायदा कलम ८८(१)(अ) बाबत शासनाने नव्याने विचार करावा, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com