

रोह्यात सर्वपक्षीय नेतेमंडळी एकाच व्यासपीठावर
रोहा, ता. १२ (बातमीदार) ः कृषी क्षेत्रात समृद्धी, आधुनिकता आणि प्रयोगशीलता यावी यासाठी रोहा कृषी प्रशासन कटिबद्ध झाले आहे. या अनुषंगाने पंचायत समिती रोहा व तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार (ता. १५) रोहा पंचायत समिती कार्यालयात तालुकास्तरीय कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे औचित्य साधून सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर दिसून येणार आहे. यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपची बडी मंडळी अग्रस्थानी असणार आहेत.
कृषी मेळाव्यात कृषीविषयक विविध प्रात्यक्षिके, आधुनिक शेती तंत्रज्ञान प्रदर्शन, कृषी साहित्यांचे वाटप तसेच प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार असून, तालुक्यात कृषी चळवळीत योगदान देत नावीन्यपूर्ण व प्रयोगशील उपक्रम राबविणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचा या वेळी गौरव करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिती तटकरे उपस्थित राहणार असून, प्रमुख अतिथी म्हणून खासदार सुनील तटकरे याशिवाय शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी, भाजपचे नेते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, भाजपचे माजी खासदार धैर्यशील पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मधुकर पाटील, माजी आमदार अनिकेत तटकरे, पंचायत समिती सभापती विजया पाशिलकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उपस्थितांपैकी राजकीय मंडळी एकमेकांना काय सल्ला देतात व कशा पद्धतीने चिमटे काढतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.