महापालिका जिम प्रकरणात गैरव्यवहाराचा आरोप

महापालिका जिम प्रकरणात गैरव्यवहाराचा आरोप
Published on

महापालिका जिम प्रकरणात गैरव्यवहाराचा आरोप
तुर्भे, ता. १२ (बातमीदार) : कुकशेत गावातील भूखंड क्र. पी-११ येथे असलेल्या महापालिकेच्या व्यायामशाळेत गंभीर अनियमितता व करारभंग होत असल्याचा आरोप समोर आला आहे. शिवसैनिक महादेव माणिकराव पवार यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
सदर जिम जय गजानन मित्र मंडळास भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. मात्र, ३० सप्टेंबर २०२३ रोजी करार संपल्यानंतरही गेल्या नऊ महिन्यांपासून कोणताही वैध करार नसताना जिम सुरू असल्याचे पवार यांनी नमूद केले आहे. नवीन करारासाठी जाहिरातही काढण्यात आलेली नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तीन मजली इमारत केवळ २१ हजार रुपयांत देण्यात आली असून, प्रत्यक्षात सदस्यांकडून १६०० रुपये मासिक शुल्क आकारले जात आहे. तसेच बी मोर फिट जिम या नावाने तृतीय पक्षाकडून जिम चालवली जात असल्याचेही उघड झाले आहे.

चौकट
कारवाईची मागणी
सदर जिम महापालिकेच्या ताब्यात घेऊन ती थेट प्रशासनामार्फत चालवावी, अशी मागणी पवार यांनी केली आहे. तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी व आर्थिक नुकसान वसूल करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com