आसुडगाव आगाराचा वर्धापन दिन उत्साहात

आसुडगाव आगाराचा वर्धापन दिन उत्साहात
Published on

आसुडगाव आगाराचा वर्धापनदिन उत्साहात
तुर्भे, ता. १२ (बातमीदार ): नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम (एन.एम.एम.टी.) अंतर्गत कार्यरत असलेली एन.एम.एम.टी. बससेवा ही नवी मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. नवी मुंबई शहरासह ठाणे, मुंबई आणि पनवेल परिसरात दररोज हजारो प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि किफायतशीर सार्वजनिक प्रवासी सेवा पुरवणाऱ्या या उपक्रमाच्या आसुडगाव आगाराचा २१ वा वर्धापन दिन सोमवारी ता. (११) रोजी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या वर्धापनदिनानिमित्त आगारात सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती. तसेच उपस्थितांसाठी महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली होती. या वेळी आगार परिसरात भक्तिमय आणि आनंदी वातावरण पाहायला मिळाले. एन.एम.एम.टी.ची बससेवा ही केवळ प्रवासाचे साधन नसून नवी मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. शहराच्या विविध भागांना जोडत प्रवाशांना वेळेत आणि सुरक्षित सेवा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य एन.एम.एम.टी. करत आहे. विशेषतः कामगार, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सेवा मोठा आधार ठरत आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी नवी मुंबई महापालिका परिवहन समितीचे विद्यमान सभापती विकास झंजाड, परिवहनचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तुषार दौंडकर, मुख्य वाहतूक अधिकारी उमाकांत जंगले, वाहतूक अधीक्षक सुनील साळुंखे, तसेच श्रमिक सेना युनियनचे सरचिटणीस चरण जाधव आगार व्यवस्थापक भगवान भोईर, प्रमुख सल्लागार किशोर पाटील, अध्यक्ष भरत कोळी यांच्यासह युनियन पदाधिकारी आणि चालक, वाहक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com