

आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त परिचारिकांचा सन्मान
विरार, ता. १२ (बातमीदार) : आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त वोक्हार्ट रुग्णालयाने आपल्या मिरा रोड, मुंबई सेंट्रल, राजकोट आणि नागपूर येथील रुग्णालयांमध्ये आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त रुग्णसेवेतील कर्मचाऱ्यांच्या समर्पण, करुणा आणि वैद्यकीय उत्कृष्टतेचा गौरव करण्यात आला आहे. या वेळी कर्मचारी सहाय्यता कार्यक्रम सुरू करण्याची घोषणाही करण्यात आली. या उपक्रमाचा उद्देश कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य आणि भावनिक सुरक्षितता अधिक सक्षम करणे हा आहे.
या उपक्रमात ९५० पेक्षा जास्त परिचारिकांनी सहभाग घेतला आहे. यात वोक्हार्ट अँथम, नर्सिंग प्रतिज्ञा, ट्रेझर हंट, माय पेशंट, माय आयडिया, नर्सिंग गॉट टॅलेंट, झुंबा सत्र, पोस्टर मेकिंग आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दीर्घकाळ सेवा देणाऱ्या परिचारिकांचा ‘सुवर्ण नाणे’ देऊन गौरव करण्यात आला. तसेच वरिष्ठ नर्सिंग लीडर्सनाही विशेष सन्मानित करण्यात आले. वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या व्यवस्थापकीय संचालिका झाबिया खोराकीवाला याबाबत म्हणाल्या, की आमच्या परिचारिका या दर्जेदार आरोग्यसेवेचा भक्कम पाया आहेत. त्यांच्या व्यावसायिक प्रगतीसोबतच त्यांच्या आरोग्य आणि कल्याणालाही आम्ही प्राधान्य देत आहोत. तर ग्रुप सीएचआरओ अमिया साहू म्हणाले, की या उपक्रमाद्वारे आम्ही आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना मानसिक आणि भावनिक पाठबळ देण्यासाठी कटिबद्ध आहोत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.