

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : ‘नव्या पिढीला शिक्षणात अत्याधुनिकतेची जोड देऊन बौद्धिक क्षमता वृद्धिंगत करावी लागेल; परंतु सततच्या मोबाईलवरील ट्वीटर, इन्स्ट्राग्राम, व्हॉट्सॲपच्या वापरातून ही कुशल संस्कृती लोप पावणार की काय,’ अशी खंत मुंबई महापालिका शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजश्री शिरवडकर यांनी व्यक्त केली.
आझाद हिंद सर्वोत्कर्ष मंडळाच्या वतीने शिक्षणात विशेष नैपुण्य सिद्ध करणाऱ्या विद्यार्थ्यांचा राजश्री शिरवडकर यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. या वेळी स्थानिक आमदार अजय चौधरी प्रमुख पाहुणे, कथालेखक काशिनाथ माटल, सामाजिक कार्यकर्ते महेश पेडणेकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. मंडळाचे प्रमुख कार्यवाह विजय परदेशी यांनी प्रास्ताविक केले.
या वेळी राजश्री शिरवडकर म्हणाल्या, ‘केवळ डॉक्टर, इंजिनिअर होऊनच नव्हे, तर मैदानी खेळातूनही बुद्धिमत्ता विकसित करता येऊ शकते. पालिका मुंबईत अनेक ठिकाणी शाळांच्या पुनर्विकासाच्या योजना राबविण्यासाठी प्रयत्नशील आहे.’
मुंबईत ज्या भूखंडांवर महापालिकेच्या जुन्या शाळा आहेत, त्यांचा पुनर्विकास करण्याची मागणी आपण लावून धरल्याचे आमदार अजय चौधरी यांनी सांगितले. आझाद हिंद सर्वोत्कर्ष मंडळाने बालवाडी शिक्षण पद्धती मुंबईत प्रथम सुरू केली तसेच वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठीही सुसज्ज वाचनालय उभे केले, याचा उल्लेख अजय चौधरी यांनी केला.
या वेळी शाल, पुस्तक आणि पारितोषिकाने विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. रचित पांचाळ या सहा वर्षांच्या विद्यार्थ्याने अलीकडेच पार पडलेल्या मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत प्रौढ गटात भाग घेतला. त्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला. या वेळी सचिव शंकर शिगवण, पद्मनाभ परळकर, देवेंद्र सावंत हे पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबई : आझाद हिंद सर्वोत्कर्ष मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांचा राजश्री शिरवडकर यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.