

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : शहरात पावसाळ्यात होणाऱ्या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने फलकांच्या (होर्डिंग) सुरक्षिततेचा मुद्दा गांभीर्याने घेतला आहे. जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे फलक कोसळून जीवितहानी होऊ नये, यासाठी पालिकेच्या जाहिरात विभागाने शहरातील सर्व अधिकृत फलक आणि टॉवर्सचे लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) बंधनकारक केले आहे. शहरातील २४३ फलकधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
मागील काही वर्षांत पुणे आणि मुंबई येथे झालेल्या फलक दुर्घटनांमध्ये नागरिकांना जीव गमवावा लागला होता. त्या घटनांनंतर राज्यभरातील महापालिकांनी शहरांमधील फलकांची तपासणी मोहीम सुरू केली होती. ठाणे महापालिकेकडूनही नियमितपणे लेखापरीक्षण केले जात असून, मागील वर्षी दोन वर्षांसाठी तपासणी पूर्ण करण्यात आली होती. प्रशासनाच्या माहितीनुसार सध्या शहरात धोकादायक स्थितीतील एकही फलक नाही. तरीदेखील, पावसाळ्यापूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून पुन्हा एकदा तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. प्रत्येक प्रभाग समितीमार्फत कर्मचारी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन फलकांची पाहणी करत आहेत. या पाहणी अहवालाच्या आधारे पुढील कारवाई निश्चित केली जाणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
...तर कायदेशीर कारवाई!
संबंधित फलकधारकांनी तातडीने लेखापरीक्षण करून त्याचा अहवाल सादर करावा अन्यथा फलकांवरील फ्लेक्स हटविण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. यानंतरही नियमांचे पालन न केल्यास संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पालिकेने दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.