मीटर न बसवता ग्राहकाला वीजबिल

मीटर न बसवता ग्राहकाला वीजबिल
Published on

मीटर न बसवता ग्राहकाला वीजबिल
डहाणूत वीज कंपनीचा भोंगळ कारभार

कासा, ता. १२ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील घोळ गावात महावितरणच्या निष्काळजी आणि भोंगळ कारभाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरगुती वीज मीटर बसविण्यापूर्वीच ग्राहकाला थेट वीजबिल पाठविण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकारामुळे वीज कंपनीच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

घोळ येथील रहिवासी सुदाम कदम यांनी मार्च महिन्यात घरगुती वीज जोडणीसाठी ऑनलाइन अर्ज केला होता. त्यानंतर मीटर बसविण्यासाठी आवश्यक असलेले शुल्कही त्यांनी वीज कंपनीकडे भरले. मात्र, दोन महिने उलटूनही त्यांच्या घरात प्रत्यक्ष वीज मीटर बसविण्यात आले नाही. असे असतानाच मे महिन्यात त्यांच्या मोबाईलवर तसेच पत्त्यावर महावितरणकडून वीजबिल पाठविण्यात आले. प्रत्यक्षात मीटरच बसविण्यात आले नसताना आणि विजेचा वापरच झालेला नसताना बिल कशाच्या आधारावर तयार करण्यात आले, असा संतप्त सवाल सुदाम कदम यांनी उपस्थित केला आहे. या प्रकारामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
------------
प्रकरणाची चौकशी करणार

याबाबत चारोटी येथील महावितरण कार्यालयात विचारणा करण्यात आली असता, मीटर बसविण्याचे काम इतर वीज कंपनीमार्फत करण्यात येते. संबंधित प्रकरणाची चौकशी करून योग्य ती माहिती घेतली जाईल, असे वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, घोळ परिसरात यापूर्वीही अशाच प्रकारच्या तक्रारी समोर आल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. काही वर्षांपूर्वीही सात ते आठ नागरिकांना मीटर न बसवता वीजबिल आल्याचे प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे वीज कंपनीच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com