पालघर पोलिसांची जनजागृती मोहीम

पालघर पोलिसांची जनजागृती मोहीम
Published on

पालघर पोलिसांची जनजागृती मोहीम
११ हजारांहून अधिक अपघात प्रकरणांची नोंद

बोईसर, ता. १२ (बातमीदार) : रस्ते अपघातातील जखमींना ‘सुवर्णक्षणात’ मदत मिळून त्यांचे जीव वाचावेत, या उद्देशाने पालघर पोलिसांनी ‘गुड समॅरिटन’ ॲपच्या माध्यमातून जनजागृती मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. पोलिस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यशाळेत पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना अपघातग्रस्तांना तातडीने प्रथमोपचार देण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी स.पो.नि. अनिल व्हटकर यांनी उपस्थितांना ‘गुड समॅरिटन’ ॲपची सविस्तर माहिती दिली. अपघातग्रस्तांना घटनास्थळी तातडीने प्रथमोपचार कसा द्यावा, आपत्कालीन परिस्थितीत कोणती खबरदारी घ्यावी आणि जखमींना त्वरित वैद्यकीय मदत कशी उपलब्ध करून द्यावी, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
या वेळी एमइएमएस संस्थेच्या डॉक्टरांनी जीवनरक्षक पद्धती, आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली आणि रुग्णवाहिका समन्वयाबाबत प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. कार्यशाळेदरम्यान उपस्थितांनी ‘गुड समॅरिटन’ ॲप डाऊनलोड करून त्याच्या प्रभावी वापराबाबत माहिती घेतली.
--------------
मोठ्या प्रमाणात जनजागृती
दरम्यान, जिल्हाभरातील विविध ठिकाणी एलईडी पडद्यांवरून ॲपची माहिती प्रसारित केली जात असून, नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती होत आहे. विशेष म्हणजे २५ डिसेंबर २०२४ ते ११ मे २०२६ या कालावधीत ‘गुड समॅरिटन’ ॲप तब्बल ३४ हजार ९३ जणांनी डाऊनलोड केले आहेत. तसेच ११ हजार ७२९ अपघात प्रकरणांची नोंद करण्यात आली असून, अपघातग्रस्तांना वेळेत मदत पोहोचविण्यास हे ॲप प्रभावी ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com