

उल्हासनगरातील भोंदूबाबाला अटक
खडकपाडा पोलिसांचा उल्हासनगरात छापा
उल्हासनगर, ता. १२ (वार्ताहर) : अंधश्रद्धा आणि पूजापाठच्या नावाखाली सुरू असलेल्या भोंदूगिरीचा आणखी एक धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये नुकताच उघडकीस आला आहे. १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी उल्हासनगरातील भोंदूबाबा शाहिद शेख याला खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईसाठी पोलिसांनी थेट उल्हासनगरात छापा टाकत आरोपीला ताब्यात घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाहिद शेख याने पीडित मुलीच्या आईशी ओळख वाढवत घरात शांतता, कौटुंबिक समस्या दूर करण्यासाठी विशेष पूजापाठ करण्याचे प्रलोभन दाखवले. त्यानुसार तो २ मे रोजी कल्याणमधील त्यांच्या घरी गेला. पूजेच्या नावाखाली त्याने १५ वर्षीय मुलीला तोकड्या कपड्यांत समोर बसण्यास भाग पाडले. त्यानंतर तिच्याशी अश्लील स्पर्श करत विनयभंग केला. भीतीमुळे मुलीने सुरुवातीला हा प्रकार कुणालाही सांगितला नाही.
दरम्यान, ६ मे रोजी आरोपी पुन्हा त्या घरी आला आणि मुलीशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या मुलीने अखेर हा प्रकार आईला सांगितला. त्यानंतर आईने मुलीसह खडकपाडा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवत उल्हासनगरात छापा टाकून आरोपी शाहिद शेखला अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास खडकपाडा पोलिसांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.