

खारघरमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार
हमालाने उकळली तब्बल २० लाखांची खंडणी
नवी मुंबई, ता. १२ (वार्ताहर) : एपीएमसी मार्केटमध्ये हमालीचे काम करणाऱ्या एका ३६ वर्षीय व्यक्तीने एका ५५ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना सोमवारी (ता. ११) उघडकीस आली. खारघर परिसरात राहणाऱ्या या महिलेला कटरचा धाक दाखवून अनेकवेळा तिच्याकडून गेल्या १० वर्षांत तब्बल २० लाख रुपये उकळल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले.
मिळालेल्या माहितीनुसार, रमेश ज्ञानदेव ढोपर (३६) असे आरोपीचे नाव असून, खारघर पोलिसांनी त्याच्या विरोधात बलात्कारासह खंडणी उकळणे तसेच धमकी देणे या कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
घटनेतील पीडित तक्रारदार महिला खारघर परिसरात वास्तव्यास आहे. २०१३ मध्ये या महिलेची ओळख एपीएमसी मार्केटमध्ये हमालीचे काम करणाऱ्या आरोपी ढोपर याच्याशी झाली होती, ही महिला मुलासह एकटीच राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपीने या महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपीने पीडित महिला आणि तिच्या मुलाच्या गळ्याला कटर लावून, जीवे मारण्याची धमकी दिली तसेच पीडितेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपीने पीडित महिलेवर लैंगिक अत्याचार करत तिचे नग्न फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. या भीतीपोटी पीडितेने वेळोवेळी आरोपीला पैसे दिले. यामध्ये रोख रक्कम, बँक ट्रान्स्फर आणि ‘फोन-पे’द्वारे एकूण २० लाख रुपये आरोपीने उकळले असल्याचे तपासात समोर आले. आरोपीच्या वाढत्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने खारघर पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.