

कांजूरमार्ग-बदलापूर मेट्रोसाठी
तीन सल्लागार कंपन्या इच्छुक
मुंबई, ता. १२ : प्रस्तावित कांजूरमार्ग-बदलापूर मेट्रो-१४च्या विस्तृत प्रकल्प अहवालाचे पुनरावलोकन होणार आहे. त्यासाठी एमएमआरडीएने मागवलेल्या निविदांनुसार तीन सल्लागार कंपन्या पुढे आल्या आहेत. मेट्रो-१४ हा कांजूरमार्ग ते बदलापूरदरम्यानचा सुमारे ४५ किमी लांबीचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णपणे उन्नत स्वरूपाचा असणार आहे. या मार्गिकेचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला; मात्र त्यात काही त्रुटी आढळल्याने त्याचे पुनरावलोकन केले जाणार आहे. त्यासाठी एमएमआरडीएने मागवलेल्या निविदांनुसार मे. एसएमईसी, मे. टीसीई, मे. राइट्स हे तीन सल्लागार आले आहेत. यापैकी निवड झालेल्या एका सल्लागाराकडून सध्याच्या विस्तृत प्रकल्प अहवालाचे पुनरावलोकन करून अंतिम अहवाल दिला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.