पडक्या इमारतीत आदिवासी विभागाचे कार्यालय

पडक्या इमारतीत आदिवासी विभागाचे कार्यालय
Published on

जीर्ण इमारतीत कारभार
कासातील टपाल कार्यालयात जीवाला घोर

कासा, ता. १३ (बातमीदार) ः कासा येथे असलेले आदिवासी विकास महामंडळ मर्यादित, नाशिक विभागाचे उपप्रादेशिक कार्यालय तसेच कासा टपाल कार्यालय जीर्ण इमारतीत सुरू आहे. अनेक वर्षांपासून भाडेकरारावर असलेली ही इमारत मोडकळीस आली असून कर्मचारी जीव मुठीत धरून काम करीत आहेत.
४० ते ४५ वर्षे जुन्या असलेल्या इमारतीची अवस्था अत्यंत खराब आहे. दरवाजे, खिडक्या तुटलेल्या अवस्थेत असून इमारतीचा स्लॅब अनेक ठिकाणी नादुरुस्त आहे. काही भागांत काँक्रीट कोसळण्याच्या स्थितीत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तरीही आदिवासी विभागाचे कर्मचारी, शिपाई, टपाल कार्यालयातील कर्मचारी धोकादायक इमारतीतूनच दैनंदिन कामे करीत आहेत. विशेष म्हणजे, चार-पाच वर्षांपूर्वी मंत्रालयातील आदिवासी आमदारांच्या समितीने कार्यालयाला भेट देऊन इमारतीची पाहणी केली होती. त्या वेळी इमारतीची तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले होते; मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अंमलबजावणी झालेली नाही.
---------------------
नवीन जागेचा शोध सुरू
कार्यालयात विविध शासकीय कामांसाठी नागरिकांची सतत वर्दळ असते. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, विविध अनेक वर्षांपासून नवीन कार्यालयासाठी जागा शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने दखल घेऊन इमारतीची दुरुस्ती किंवा कार्यालये सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावीत, अशी मागणी होत आहे.
--------------------------
सध्या एका ठिकाणी जागा उपलब्ध झाली असून त्याबाबत कागदपत्रांची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच कार्यालय स्थलांतरित करण्यात येईल.
- एस. पाटील, अधिकारी, आदिवासी विकास विभाग, कासा
------------------------
इमारत अतिशय जुनी झाली असून कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचा विमा उतरवण्यात आला आहे. नवीन जागेसाठी प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
- रवी खैनी, पोस्टमास्तर, कासा
--------------------------
टपाल कार्यालयात विविध योजनांसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येतात. इमारतीची अवस्था पाहता पावसाळ्यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- संजय सावकारे, ग्रामस्थ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com