खारघर सेक्टर १० मध्ये दूषित पाणी पुरवठा

खारघर सेक्टर १० मध्ये दूषित पाणी पुरवठा
Published on

खारघर सेक्टर १० मध्ये दूषित पाणीपुरवठा
आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
खारघर, ता. १३ (बातमीदार) : खारघर सेक्टर १० या परिसरात मागील दोन दिवसांपासून दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये आरोग्याचे प्रश्न उद्भवण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकारावर सिडको प्रशासनाविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
खारघर परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. अशातच, दोन दिवसांपासून दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती असून, नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. रहिवासी मधुकर मयेकर म्हणाले की, सिडकोकडून दूषित पाणीपुरवठा होत असून, पाण्याला तीव्र वास येत आहे. यामुळे पाणी विकत घेऊन प्यावे लागत आहे, तर काही ठिकाणी जलवाहिन्यांमध्ये गळती होत असल्याने सांडपाणी मिसळत असल्याचा संशयदेखील काही नागरिकांनी व्यक्त केला आहे. प्रशासनाने तातडीने पाण्याची तपासणी करून स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

पाण्याचे कॅन विकत घेण्याची वेळ
अनेक कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी बाजारातून पाण्याचे कॅन विकत घ्यावे लागत असून, आर्थिक भारही वाढला आहे. सिडको प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन दूषित पाणीपुरवठ्याची समस्या सोडवावी, अशी मागणी परिसरातून होत आहे. यासंदर्भात सिडकोच्या पाणीपुरवठा विभागात विचारणा केली असता, नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाले असून, ही समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com