पनवेलमध्ये मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षणासाठी आढावा बैठक

पनवेलमध्ये मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षणासाठी आढावा बैठक
Published on

मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षणासाठी आढावा बैठक
अवैध नोंदी रोखणे व दोषमुक्त मतदारयादी तयार करण्यावर भर
पनवेल, ता. १३ (बातमीदार) ः मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी (ता. ११) पालिका मुख्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अधिक अचूक, पारदर्शक आणि दोषमुक्त करण्यासाठी या बैठकीत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस एसआयआर अभियानाचे प्रदेश संयोजक किरीट सोमय्या, आमदार प्रशांत ठाकूर, महापौर नितीन पाटील यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि विविध विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच, या बैठकीला सभागृहनेते प्रकाश बिनेदार, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, नगरसेवक परेश ठाकूर, रवींद्र भगत, सुमित झुंझारराव, अजय बहिरा, शशिकांत शेळके, प्रीती जॉर्ज, अस्मिता घरत, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटये, जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

आवश्यक उपाययोजनांची आखणी
बैठकीदरम्यान मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, पुनर्पडताळणी आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची आखणी करण्यात आली. मतदार यादीतील अवैध नोंदी रोखणे, मृत व्यक्तींची नावे वगळणे, स्थलांतरित नागरिकांची माहिती अद्ययावत करणे तसेच पात्र नागरिकांची नोंदणी सुनिश्चित करणे यावर भर देण्यात आला. यासोबतच मागील काही काळात महापालिका हद्दीत वितरित केलेल्या जन्म आणि मृत्यू दाखल्यांच्या अनुषंगानेही चर्चा करण्यात आली. संबंधित नोंदींचा वापर मतदार यादी शुद्धीकरण प्रक्रियेत कसा प्रभावीपणे करता येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com