रबाळेत पोलिसांवर दगडफेक

रबाळेत पोलिसांवर दगडफेक
Published on

रबाळेत पोलिसांवर दगडफेक
कर्तव्यावर असलेल्या पोलिस नाईकावर हल्ला, आरोपी गजाआड
नवी मुंबई, ता. १३ (वार्ताहर) : तळवली नाका परिसरात सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर एका तरुणाने दगडफेक करून जखमी केल्याची घटना मंगळवारी (ता. १२) घडली. रबाळे पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. अजय बनसोडे असे आरोपीचे नाव असून, त्याने पोलिस ठाण्यातदेखील गोंधळ घालत उपस्थित पोलिसांना शिवीगाळ केली.
रबाळे पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक विष्णू भोसले हे आपले सहकारी पोलिस शिपाई दळवी यांच्यासह मंगळवारी गस्तीवर होते. या वेळी तळवली नाका येथील अ पोपेय चायनीज सेंटरजवळ अजय बनसोडे हा मारामारी करत असल्याचे निदर्शनास आले. हा वाद सोडवण्यासाठी पोलिस त्या ठिकाणी पोहोचले असता, अजयने पोलिसांवरच हल्ला चढवत दगड भिरकावले. यामध्ये पोलिस नाईक भोसले जखमी झाले आहेत. त्यामुळे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याला पोलिस ठाण्यात आणल्यानंतरही त्याने अंमलदार कक्षात गोंधळ घालत उपस्थित पोलिसांना शिवीगाळ केली. तसेच, आरोपीने पोलिसांना तुमची सगळ्यांची वाट लावतो, अशी उघड धमकी दिली. याप्रकरणी रबाळे पोलिसांनी अजय बनसोडेविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com