संजय घुडे यांना मुंबई विद्यापीठाकडून पीएचडी

संजय घुडे यांना मुंबई विद्यापीठाकडून पीएचडी
Published on

मुरबाड (वार्ताहर) : माळशेज पोलिस मदत केंद्र येथे कार्यरत असलेले पोलिस अंमलदार, प्राणीमित्र आणि गायक संजय घुडे यांना मुंबई विद्यापीठाकडून पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. मध्ययुगीन महाराष्ट्राचा संत वाङ्‍मयातील जात-वर्णाचे आकलन या विषयावर त्यांनी संशोधन पूर्ण केले. नोकरी सांभाळत त्यांनी सातत्याने शैक्षणिक वाटचाल सुरू ठेवली. सामाजिक कार्यातही ते भजन-कीर्तनाच्या माध्यमातून सक्रिय सहभाग घेत असतात. कोरोनाकाळात जनजागृती आणि अपघात प्रतिबंधासाठी त्यांनी विविध गाणी तयार करून समाज माध्यमांवर प्रसारित केली. त्यांच्या या उपक्रमांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. संजय घुडे यांनी एम.ए., पीएचडी, एलएलएम, एमएसडब्ल्यू, डीएलएल अँड एलडब्ल्यू; तसेच सुगम संगीताचे शिक्षण पूर्ण केले आहे. पोलिस सेवेसोबतच सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com