महडच्या वरदविनायक देऊळाचा जीर्णोद्धार होणार

महडच्या वरदविनायक देऊळाचा जीर्णोद्धार होणार
Published on

महडच्या वरदविनायक मंदिराचा जीर्णोद्धार होणार
२८ कोटींचा निधी मंजूर
खालापूर, ता. १३ (बातमीदार) : शासनाकडून अष्टविनायक तीर्थक्षेत्राचा नव्याने विकास आराखडा तयार करण्यात येत असून, त्या अंतर्गत खालापूर तालुक्यातील महड मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी २८ कोटी २४ लाख ६३ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. अष्टविनायकापैकी दोन ठिकाण रायगड जिल्ह्यात आहेत. त्यापैकी पाली आणि दुसरे महड मंदिर प्रख्यात आहे. विशेषकरून महड हे ठिकाण मुंबई-पुणे या महामार्गावर असल्याने या ठिकाणी बाराही महिने भाविकांची वर्दळ असते.
मंदिराचा जीर्णोद्धार करताना मूळ मंदिराचा गाभारा वगळता सर्व बांधकाम जमीनदोस्त होणार आहे. साधारण त्यामुळे तीन महिने मंदिर दर्शनासाठी भाविकांना पूर्णपणे बंद राहणार आहे, तर मंदिराचे पूर्णपणे काम होण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी जाणार आहे. या अगोदर महड मंदिराचा दोन दशकांपूर्वी जीर्णोद्धार करताना काँक्रीटमध्ये बांधण्यात आले होते. आता शासन आणि पुरातत्त्व विभाग मंदिराचा जीर्णोद्धार करताना मंदिराची रचना हेमाडपंती राहील यासाठी आराखडा तयार केला असून, जवळपास २८ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली. वरदविनायक गणपतीची मूर्ती सापडलेल्या तळ्याचेदेखील सुशोभीकरण होणार असून, तळ्यामध्ये आकर्षक कारंजी तसेच सभोवतालचा परिसर विकसित होणार आहे. यामुळे महड तीर्थक्षेत्राचे रूप पालटणार आहे.

चौकट-
तीन महिने मंदिर बंद
जीर्णोद्धार वेळी तीन महिने मंदिर बंद राहणार आहे. आर्थिक उलाढाल ठप्प होण्याची भीती ग्रामस्थांना सतावत आहे. या अनुषंगाने श्री गणपती संस्थान महड विश्वस्त आणि ग्रामस्थ यांची बैठक रविवारी महड येथे पार पडली. या बैठकीला देवस्थान संस्थानाच्या कार्याध्यक्ष मोहिनी वैद्य, केदार जोशी, विवेक पेठे, श्री काशीकर, खालापूर पोलिस निरीक्षक सचिन पवार तसेच महडमधील ग्रामस्थ उपस्थित होते.

कोट-
बैठकीमध्ये मंदिराचे काम वेगाने पूर्ण व्हावे, निधीअभावी काम ठप्प होऊ नये, यासाठी संस्थान ठेकेदाराला सूचना करेल तसेच कामाचा कालावधी निश्चित किती असेल, असे लेखी स्वरूपात घेण्यासाठी आग्रही आहोत.
-मंदार जोशी, महड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com