

मुरबाड (बातमीदार) : दहावी आणि बारावीनंतर पुढे कोणती शैक्षणिक दिशा निवडावी, याबाबत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने मुरबाडमध्ये करिअर मार्गदर्शन शिबिर घेण्यात येणार आहे. शिवसेना नगरसेवक संतोष जाधव आणि स्वाती जाधव या दाम्पत्याच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांसाठी दहावी-बारावीनंतर पुढे काय? या विषयावर मोफत मार्गदर्शन मेळावा रविवारी (ता. १७) सकाळी साडेदहा वाजता श्रीराम मंदिरात होणार आहे. शिबिरात ज्येष्ठ करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर विद्यार्थ्यांसह पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. दहावीनंतर उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक संधी, अभ्यासक्रम; तसेच विद्यार्थ्यांच्या आवडी आणि क्षमतेनुसार योग्य शाखेची निवड कशी करावी याबाबत ते सविस्तर माहिती देणार आहेत. विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविणाऱ्या महत्त्वाच्या टप्प्यावर हे मार्गदर्शन उपयुक्त ठरणार असल्याने जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.