आपत्ती व्यवस्थापनात भारताचा मान उंचावला!

आपत्ती व्यवस्थापनात भारताचा मान उंचावला!
Published on

आपत्ती व्यवस्थापनात भारताचा मान उंचावला!
आयएनसीओआयएसला ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार’
अलिबाग, ता. १३ (वार्ताहर)ः आपत्ती व्यवस्थापन आणि महासागराशी संबंधित धोक्यांसाठी अचूक व वेळेवर पूर्वसूचना देण्यात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल आयएनसीओआयएस अर्थात भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र यांना प्रतिष्ठेचा सुभाषचंद्र बोस आपदा पुरस्कार २०२५ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील देशातील सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान मानला जातो.
पृथ्वी विज्ञान मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या या संस्थेने त्सुनामी, वादळी लाटा, स्वेल सर्जेस आणि सागरी उष्णतेच्या लाटांसारख्या विविध सागरी धोक्यांबाबत प्रभावी पूर्वसूचना सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे किनारपट्टीवरील नागरिकांचे जीवित व मालमत्ता सुरक्षित ठेवण्यास मोठी मदत झाली आहे.
दरवर्षी २३ जानेवारी, म्हणजेच सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी या पुरस्काराची घोषणा केली जाते. २०२५चा हा पुरस्कार आयएनसीओआयएसच्या आपत्ती पूर्वतयारी, प्रतिसाद आणि पुनर्वसनातील मोलाच्या योगदानाची दखल घेत प्रदान करण्यात आला आहे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था नवी दिल्ली येथे आयोजित ‘वार्षिक मदत आयुक्त परिषद’ दरम्यान हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते आयएनसीओआयएसचे संचालक डॉ. टी. एम. बालकृष्णन नायर यांना हा सन्मान देण्यात आला. पुरस्कारामध्ये प्रमाणपत्रासह ५१ लाख रुपयांची रोख रक्कमही देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com