कोशिंबी येथे महसूल समाधान शिबिर

कोशिंबी येथे महसूल समाधान शिबिर
Published on

वज्रेश्वरी, ता. १२ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील राहूर मंडळ कार्यक्षेत्रातील कोशिंबी येथील विकास सेवा ट्रस्ट (अनाथ आश्रम) येथे शुक्रवारी (ता. १५) छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर होणार आहे. भिवंडी तहसील कार्यालयामार्फत टप्पा क्रमांक एकमधील हे शेवटचे शिबिर असणार आहे.
कोशिंबी तलाठी सजाचे नरसूबाबा तुगावे आणि सहकाऱ्यांनी शिबिरासाठी विशेष तयारी केली आहे. नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी मोठा मंडप उभारून बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. विविध शासकीय योजनांचे अर्जही पूर्वतयारी म्हणून भरून घेतले जात आहेत. कोशिंबी हद्दीतील खनिवली परिसरात शुक्रवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत हे शिबिर होणार आहे. सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांना विविध महसुली दाखले, शासकीय योजनांची माहिती, प्रमाणपत्रे, सातबारा उतारे, रेशनिंग कार्डसंबंधित सेवा आदी सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा उद्देश या शिबिरामागे आहे. महसूल विभागाच्या सेवा नागरिकांच्या दारी पोहोचवून प्रशासन अधिक गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी हे शिबिर महत्त्वाचे ठरणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भिवंडी तहसीलदार अभिजित खोले, नायब तहसीलदार विशाल इदुलकर, पडघा मंडळ अधिकारी संतोष अगिवले, राहूर मंडळ अधिकारी रविंद्र काळे, तलाठी नरसूबाबा तुगावे तसेच आमणे तलाठी सजिव धात्रक यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com