कुर्बानी जागेसाठी १९ मेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

कुर्बानी जागेसाठी १९ मेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
Published on

भिवंडी, ता. १३ (बातमीदार) : बकरी ईदनिमित्त जनावरांच्या कुर्बानीसाठी महापालिकेने तात्पुरत्या जागेसाठी परवानगी देण्याचे काम सुरू केले आहे. महापालिका आयुक्तांना सणाकरिता किंवा विशिष्ट परिस्थितीत कुर्बानी देण्यासाठी जागेला परवानगी देण्याचे अधिकार आहे. ज्या व्यक्ती अथवा अशासकीय संस्थांना स्वःमालकीच्या जागेत कुर्बानीकरिता ना हरकत दाखला, परवानगी मिळवण्याची परवानगी पालिका क्षेत्रीय प्रभाग समिती कार्यालयात प्रभाग अधिकारी यांच्याकडे १९ मेपर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. त्याच दिवशी परवानगीसंबंधी निर्णय घेऊन पालिकेमार्फत कार्यवाही करण्यात येईल. पालिका कार्यक्षेत्राबाहेरील व्यक्तीस परवानगी देण्यात येणार नाही, असे आदेश महापालिका आयुक्त अनमोल सागर यांनी जाहीर केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com