मराठीत फलक लावा अन्यथा आंदोलन

मराठीत फलक लावा अन्यथा आंदोलन
Published on

मराठीत फलक लावा अन्यथा आंदोलन
प्रसाद भोईर यांचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला निवेदन
पेण, ता. १३ (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गावर लावण्यात आलेल्या हिंदी भाषिक फलकांवर शिवसेना ठाकरे गटाने आक्षेप घेतला असून, सदरचे फलक मराठीत करून रस्त्यावरील रखडलेली कामे, प्रस्तावित टोलवसुली यासह पेण तालुक्यातील वाशी नाका ते उंबर्डे फाटा दरम्यानच्या धोकादायक अंतर्गत रस्त्याची तत्काळ दुरुस्त करावी अन्यथा शिवसेना आंदोलन करेल, अशा मागणीचे निवेदन शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक तथा कार्यकारी अभियंता इंगोले यांना देण्यात आले आहे.
राज्यातील एकमेव असणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्याप अनेक ठिकाणी अपूर्ण अवस्थेत असून, महामार्गाच्या कामासाठी अनेकदा मुदतवाढ देऊनही येथील साईट पट्ट्या उड्डाणपूल, अंडरपास, ड्रेनेज व्यवस्था आणि इतरही मूलभूत सुविधा पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे अपूर्ण असलेले रस्ते, खड्डे, धुळीचे प्रदूषण आणि चुकीच्या नियोजनामुळे अनेकदा अपघात घडत आहेत.त्यातच महामार्गावर लावण्यात आलेल्या हिंदी भाषिक फलकांमुळे मराठी भाषेचा होत असणारा अपमान ठाकरे गट कदापि सहन करणार नसून खारपाडा येथे सुरू होणाऱ्या टोलनाक्यावरून रायगडकरांना सूट द्यावी अन्यथा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या वेळी त्यांच्यासमवेत पेण तालुकाप्रमुख समीर म्हात्रे, युवासेना अधिकारी योगेश पाटील यांच्यासह इतरही शिवसैनिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com