कामगाराची हत्या

कामगाराची हत्या
Published on

भिवंडी (वार्ताहर) : तालुक्यातील शेडगाव गावातील रात्रपाळी कामावर जाणाऱ्या व्यक्तीची काही हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करीत हत्या केल्याची घटना घडली आहे. परेश तोलाराम पाटील (वय ४०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परेश हे नेहमीप्रमाणे आपल्या घरून कामावर निघाले होते. त्यांच्या गावाच्या हद्दीतच दबा धरून बसलेल्या संशयितांनी धारदार शस्त्राच्या साह्याने त्यांच्यावर हल्ला केल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. याबाबत गणेशपुरी पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून निरीक्षक कमलेश बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com