अनधिकृत प्रिझमा आरएमसी प्लांटवर सिडकोची कारवाई

अनधिकृत प्रिझमा आरएमसी प्लांटवर सिडकोची कारवाई
Published on

अनधिकृत प्रिझमा आरएमसी प्लांटवर सिडकोची कारवाई
तुर्भे, ता. १३ (बातमीदार) : सिडकोच्या अनधिकृत बांधकामे (नवी मुंबई) विभागामार्फत मंगळवारी (ता. १२) तुर्भे परिसरातील मौजे बोनसरी, सर्व्हे क्रमांक २०३ येथे मोठी निष्कासन मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत प्रिझमा आरएमसी प्लांटमधील विविध अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली.
सिडको प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी सिडको महामंडळ अथवा संबंधित प्राधिकरणाची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता बांधकाम उभारण्यात आले होते. तसेच हे बांधकाम सिडकोच्या प्रचलित नियमावली व धोरणांचा भंग करून करण्यात आल्याचे निदर्शनास आले.
कारवाईदरम्यान एक मिक्सर, तीन सायलो, एक कंटेनर, दोन विटांची बांधकामे तसेच टिनपत्र्याचे शेड आदी अनधिकृत संरचना हटविण्यात आल्या. ही मोहीम अत्यंत कडक बंदोबस्तात पार पडली. या निष्कासन मोहिमेसाठी २० मजूर, एक पोकलेन मशीन, एक जेसीबी, दोन ब्रेकर, एक सुपरवायझर, एक फोटोग्राफर आणि एक व्हिडिओग्राफर यांची नियुक्ती करण्यात आली होती.
सदर कारवाई मुख्य दक्षता अधिकारी यांच्या निर्देशानुसार तसेच मुख्य नियंत्रक, अनधिकृत बांधकामे (नवी मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मोहिमेत सिडको अतिक्रमण विभागाचे नियंत्रक व कर्मचारी, सिडको पोलिस पथक, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, सुरक्षा पर्यवेक्षक व रक्षक, महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक तसेच महावितरण विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.
सिडको प्रशासनाने स्पष्ट केले की, नवी मुंबई परिसरातील अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाया पुढेही सुरू राहणार असून, नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com