

ठाणे, ता. १३ : कळवा येथील सुरक्षा रक्षकाचा मोबाईल लोकल प्रवासादरम्यान हिसकावून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोपरीमधील श्याम चंद्रकर (वय ३१) या चोरट्याला लोहमार्ग पोलिसांनी पकडल्याची घटना मंगळवारी मुंब्रा रेल्वे स्थानकात घडली.
कळवा येथील तक्रारदार अशोक पाटील (वय ५५) हे अंबरनाथ येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. नेहमीप्रमाणे सकाळी ६.४० वाजता कळवा स्थानकावरून अंबरनाथ लोकलने कामावर जात होते. लोकल मुंब्रा स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर सकाळी ६.४५ वाजता पोहोचून सुटताना एका चोरट्याने त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला. पाटील यांनी आरडाओरडा करत पाठलाग केला. फलाटावरील रेल्वे पोलिसांनी तत्काळ चंद्रकर याला पकडून ठाणे लोहमार्ग पोविस ठाण्यात आणले. त्याच्याकडून दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.