वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेचा छापा

वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेचा छापा
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : भिवंडीतील काल्हेर परिसरात सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायावर ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने मंगळवारी (ता. १२) छापा टाकत एका महिला दलालाला अटक केली. या कारवाईदरम्यान दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.
पोलिसांना गुप्त माहितीदारामार्फत भिवंडीतील एका लॉजिंग-बोर्डिंगच्या परिसरात काही असहाय्य महिलांना प्रलोभन दाखवून वेश्याव्यवसायासाठी आणले जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैशाली गोरडे यांना मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत महिला दलालाला ताब्यात घेत तिच्या तावडीतून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलांना शांतीसदन येथे ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक आयुक्त विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com