

सुका आणि ओला कचऱ्याचे वर्गीकरण करा
पालिकेकडून सोसायटीला नोटीस
खारघर, ता. १३ (बातमीदार) : पनवेल महापालिका प्रशासनाने शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ अंतर्गत कचरानिर्मितीच्या ठिकाणीच कचऱ्याचे वर्गीकरण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ मेपासून करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या नोटीसमधून देण्यात आली आहे.
पालिका परिसर स्वच्छ आणि सुंदर असावे यासाठी पालिकेकडून प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी पालिकेने नागरिक, गृहनिर्माण संस्था, दुकानदार तसेच व्यावसायिक आस्थापनांना कचरा चार प्रकारांमध्ये वेगळा करून देण्याचे आवाहन केले आहे. ओला कचरा हिरव्या डब्यात, सुका कचरा निळ्या डब्यात तर वेगळ्या डब्यात सॅनिटरी नॅपकिन, डायपर, तसेच विशेष कचरा वेगळ्या डब्यात जमा करणे आवश्यक राहणार आहे.
पालिकेने स्पष्ट केले आहे की, ज्या घरांमधून किंवा सोसायट्यांमधून अवर्गीकृत अथवा मिश्र कचरा दिला जाईल, त्या ठिकाणचा कचरा संकलित केला जाणार नाही. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात येणार आहे. पालिकेने लागू केलेल्या नियमामुळे शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध होण्यास मदत होणार असून, पुनर्वापर आणि पर्यावरण संरक्षणालाही चालना मिळणार आहे. नागरिकांनी वर्गीकृत कचरा देऊन स्वच्छ आणि सुंदर शहर घडविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.