

कळवा (बातमीदार) : कौसा येथील दिवा-आगासन रस्त्यानजीकच्या एकवीरा गॅलेक्सी इमारतीत मंगळवारी (ता. १२) रात्रीच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे घरात आग लागून घरगुती वस्तू खाक झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या मोहन गुप्ता यांच्या घरात शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागून घरातील कपाट, कपडे, भांडी व विजेची उपकरणे खाक झाली. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.