सीजीएस कॉलनीत पदपथावरील अनधिकृत दुकानांवर कारवाई

सीजीएस कॉलनीत पदपथावरील अनधिकृत दुकानांवर कारवाई
Published on

सीजीएस कॉलनीत पदपथावरील अनधिकृत दुकानांवर कारवाई
नागरिकांना दिलासा, पादचाऱ्यांचा मार्ग पुन्हा मोकळा

घाटकोपर, ता. १३ (बातमीदार) ः सीजीएस कॉलनी परिसरातील पदपथावर अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या दुकानावर मंगळवारी (ता. १२) महापालिकेने धडक कारवाई केली. या कारवाईत पदपथावरील १२ अनधिकृत दुकाने पालिकेने निष्कासित केली. संबंधित विभागाने कारवाई करत पदपथ नागरिकांना चालण्यासाठी मोकळे केले.
स्थानिक नागरिकांकडून नगरसेवक धर्मेश गिरी यांच्याकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर उपायुक्त संतोषकुमार धोंडे, सहाय्यक आयुक्त मारुती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अभियंता भरत केदार यांनी ही मोठी कारवाई केली. या दुकानांमुळे परिसरातील नागरिकांना तसेच पादचाऱ्यांना पदपथांवरून ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना रस्त्यावरून चालावे लागत असल्याने सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com