भारतीय उद्योगांच्या संरक्षणासाठी एअरटेल सिक्युअर वर्कफोर्स

भारतीय उद्योगांच्या संरक्षणासाठी एअरटेल सिक्युअर वर्कफोर्स
Published on

मुंबई, ता. १३ : वाढत्या सायबर धोक्यांचा सामना करण्यासाठी, भारती एअरटेलच्या एअरटेल बिझनेसने उद्योगांसाठी सज्ज सुरक्षा स्टॅकसह देशातील पहिली सुरक्षा व्यवस्था एअरटेल सिक्युअर वर्कफोर्स विकसित केली आहे.

आजच्या एआयचलित युगात सायबर हल्ल्यांचे प्रमाण, वेग आणि गुंतागुंत झपाट्याने वाढत असून, हे सायबर फ्रॉड, बहुतेक संरक्षण व्यवस्थांना निष्प्रभ करत प्रत्येक संस्थेला संभाव्य लक्ष्य बनवीत आहेत. २०२५ मध्ये २० लाखांहून जास्त सायबर गुन्हे नोंदविण्यात आल्याची आकडेवारी आहे.

एअरटेलच्या देशव्यापी नेटवर्क, सतत तज्ज्ञ देखरेख आणि राष्ट्रीय स्तरावरील सुरक्षा अनुभवाच्या बळावर चालणारे एअरटेल सिक्युअर वर्कफोर्स, उद्योगांना आवश्यक सुरक्षा प्रदान करेल, तसेच स्वतःची सुरक्षा व्यवस्था उभारणे आणि चालविण्याचा परिचालनात्मक भार संस्थांकडून दूर करेल. वापरकर्ते, उपकरणे, नेटवर्क, अ‍ॅप्लिकेशन्स आणि डेटा यांमधील एंडपॉइंट्सचे संरक्षण ही व्यवस्था करेल, असे एअरटेल बिझनेसचे सीईओ शरत सिन्हा म्हणाले. यामुळे कंपन्यांना त्यांच्या सुरक्षा खर्चात ३० टक्क्यांपर्यंत कपात साधता येईल आणि ते त्यांच्या व्यवसायवृद्धीवर लक्ष केंद्रित करू शकतील, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com