

शायना एनसी ऑक्सफर्डच्या दौऱ्यावर
मुंबई, ता. १३ : शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या विशेष शैक्षणिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. दक्षिण आणि आग्नेय आशियातील महिलांचे सार्वजनिक जीवन तसेच राजकारणातील प्रतिनिधित्व या विषयावर त्या सखोल अभ्यास करणार आहेत. दोन आठवड्यांच्या या कार्यक्रमात नेतृत्व, घटनात्मक रचना, राजकीय संस्था, स्थलांतर आणि लिंगभेद यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ‘हिस्ट्री, पॉलिटिक्स अँड सोसायटी’ अभ्यासक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विविध देशांतील महिलांच्या राजकीय सहभागाचा तुलनात्मक अभ्यास केला जाणार आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका या देशांतील सामाजिक व घटनात्मक बदलांचा महिलांच्या नेतृत्वावर झालेला परिणामही या अभ्यासाचा भाग असणार आहे. या अभ्यासक्रमानंतर महिला नेतृत्व अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक धोरणात्मक उपाय सुचवणारा प्रबंध त्या सादर करणार आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या उपक्रमांना या अभ्यासाचा निश्चितच उपयोग होईल, असा विश्वास शायना एनसी यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.